असलम परवेज
"९६% गुण घेऊन पटकावला प्रथम स्थान: यासिर यांचे डॉक्टर होऊन समाज सेवा करण्याचे स्वप्न"
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा मंडळ तर्फे मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल अनसिंग या शाळेचा विद्यार्थी मोहम्मद यासिर अम्मार अब्दुल रहेमान यांनी ९६% टक्के गुण प्राप्त करून शाळेतील ८१ विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावले आहे व जिल्ह्यात शाळेचे नाव रोशन केले आहे.
यासिर अम्मार ह्याला विज्ञान व गणित विषयांमध्ये विशेष आवड असल्याचे समजते. त्यामुळे यासिरनी विज्ञान विषयांमध्ये १००गुणा पैकी ९८ तर गणित मध्ये ९७ गुण मिळवले आहे, तसेच समाज शास्त्र या विषयांमध्ये ९७गुण, उर्दू प्रथम भाषामध्ये ९७गुण, मराठी द्वतिय भाषा मध्ये ९२ तर इंग्रजी भाषामध्ये ९२ गूण प्राप्त करुन यश मिळवले आहे. संस्था अध्यक्ष पांडुरंग ठाकरे,सर्व संस्था चालक मंडळ, मुख्याध्यापक शेख मोहम्मद मुस्तफा यांनी यासिर अम्मार सोबतच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यासिर यांनी आपले सफलतेचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक शेख मोहम्मद मुस्तफा, आपले मार्गदर्शक शिक्षक शेख बुरहान, मोहम्मद जाकीर, अब्दुल रहेमान व आपले आई वडिलांना दिले आहे.
यावेळी शिक्षक मोहम्मद मोहसीन, मोहम्मद शारीक, मोहम्मद इमरान, पठाण इमरान खान, अब्दूल मोहसीन, अब्दूल साजीद, इमरान खान, एहतेशामोद्दीन खतीब, शिक्षकेत्तर कर्मचारी मनिष मखमले, मोहम्मद सादिक, अब्दूल अज़िज़ विजय मुसळे यांनी यासिर यांना पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन मनोबल वाढवले व डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याकरिता शुभेच्छा दिल्यात.
