मालेगाव प्रतिनिधी
मालेगाव : येथील माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मालेगावातील नामांकित योग शिक्षिका स्वाती मराठे यांनी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून तसेच गुरुजनांकडून सामुदायिकरीत्या विविध आसने करून घेतली . या आसनांमध्ये वृक्षासन, वज्रासन, मृदुंगासन, ताडास6न, कटिचक्रासन, त्रिकोणासन , भद्रासन, मार्जारासन या आसनांचा समावेश होता. त्याशिवाय मराठे यांनी मानेचे, कंबरेचे आणि गुडघ्याचे विविध व्यायाम उपस्थितांकडून करून घेतले. प्राणायामात त्यांनी भ्रामरी आणि शितलीकरण प्राणायाम करून घेतला.
स्वाती मराठे यांनी योगासने करण्याचे महत्त्व आणि शरीराला त्यापासून होणारे लाभ सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींना आणि गुरुजनांना विशद केले.
किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य संजय पाठक यांनी आभारप्रदर्शन केले.
माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ.वनिताताई पवार, सचिव श्री.राजेंद्र पवार यांच्यासह किलबिल इंग्लिश मीडियमच्या सर्व गुरुजनांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगासनांच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
प्रार्थना आणि ओमकार जपाने योग दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
