असलम परवेज: तालुका प्रतिनिधी लोणार
दिनांक 29 जून 2022 पासून विदर्भातील सर्व शाळा नियमितपणे विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या. कोरोना काळानंतर शाळेची ही सुरुवात विद्यार्थ्यांचे साठी आनंदमय होण्याची शुभेच्छा देण्याकरिता लोणार नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. शाळांमधील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीकरिता ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.
नगरपालिकेचे शाळेतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे नगरपरिषदेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी उपनगराध्यक्ष तथा शिक्षण सभापती नूर मोहम्मद खान उर्फ बादशाह खान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नगरपरिषदेतील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्याची हमी दिली तसेच पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधांचा आभाव पडू देणार नाही अशी ग्वाही दिली व आजाद नगर मधील उर्दू शाळेला परिपूर्ण सुविधा देण्याचे आश्वासनही यावेळी दिले. नगरसेवक प्राध्यापक गजानन खरात यांनी पालिकेच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना नगर परिषदेतर्फे शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा दिली .
यावेळी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्याकरिता लोणार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पूनम पाटोळे, उपनगराध्यक्ष तथा शिक्षण सभापती बादशाह खान, नगरपरिषदेचे गटनेते भूषण मापारी, नगरसेवक गजानन खरात, साहेबराव पाटोळे, पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सतीश कापुरे, उर्दू शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक शेख इस्माईल, शेख कदीर, पंजाबराव मापारी, राजू वानखेडे, सय्यद सोहेल, पालक वर्ग आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
