Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आन्वी येथील बौध्द बांधवावरील खोटे गुन्हे तात्काळ माघे घ्यावे-प्रशांतभैया डोंगरदिवे

Responsive Ad Here

प्रतिनिधी/भरत जोगदंडे

बौध्द समाजबांधवांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवा एनडीएमजे ची मागणी


        चिखली:- मौजे आन्वी येथील बौध्द समाज बांधवाना जबर मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणारांवर कठोर कारवाही होऊन फरार आरोपींना तात्काळ जेर बंद करण्यात यावे या आषयाचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीजच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना तहसिलदार चिखली च्यामार्फत देण्यात आले.



    मौजे आन्वी ता. चिखली जि.बुलडाणा येथील बौध्द समाज बांधवांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाच्या जमीनीवर गेल्या ४० ते ५० वर्षापासुन अतिक्रमण करुन आपली उपजिवीका भागवीत होते. परंतु सुरुवातीच्या काळापासुन गावातील जातीयवादी लोकांनी त्यांच्या जमीनी शासकीय नियमानुसार हस्तांतरीत होऊ दिल्या नाहीत. जाणुनबुजुन जातीयद्वेष भावनेतुन आन्वी येथील बौद्ध बांधवांना नाहक त्रास देत आले आहे. त्याची पुनरावृत्ती म्हणुन दि. ३० जुन २०२२ रोजी बौध्द समाज बांधव हे आपल्या अतिक्रमीत शेतीत शेती कामे करीत असतांना आन्वी गावातील पोलीस पाटील व ग्रामसेवक पवार यांनी बौध्द बांधव व महीलांना जबर मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानुसार चिखली पोलीसांनी विविध कलमान्वये अनुसुचित जाती जमाती प्रतीबंधक कायदयानुसार गुन्हे दाखल केले आहे. 

    परंतु बौध्द बांधवांची कोणत्याही प्रकारची चुकी नसतांना त्यांच्यावर खोटे व चुकीचे अन्यायकारक गुन्हयाची नोंद सुध्दा चिखली पोलीस प्रशासनाने केली आहे. त्यामुळे मौजे आन्वी येथील बौध्द बांधवांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच जातीवादी पोलीस पाटील व ग्रामसेवक पवार हे फरार असल्यामुळे त्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीज बुलडाणा जिल्हयाच्या वतीने तीव्र आंदोनल छेडण्यात येईल यावी नोंद घ्यावी. असा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टीजचे विदर्भ सचिव भारत गवई, विदर्भ कायदेविषयक सल्लागार अॅड. रुचीता जाधव, जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैय्या डोंगरदिवे, जिल्हा समन्वयक सौ. आशाताई भारत कस्तुरे, तालुका सदस्य विरसेन साळवे, यूवती तालुका अध्यक्ष आश्वीनी मोरे यांच्यासह ईतर पदाधीकारी उपस्थीत होते