Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कुंड खुर्द येथील 23 वर्षीय तरुणी बेपत्ता

Responsive Ad Here

 मलकापूर प्रतिनिधी 

 मलकापूर तालुक्यातील कुंड खुर्द येथील 23 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना उघडीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की शुभांगी शंकर झनके वय 23 वर्ष रा. कुंड खुर्द. सदर तरुणीची आजी आजारी होती ते मलकापूरला दवाखान्यात जाण्यासाठी निघाले व मलकापुर शहरातील चार खांबा चौक येथे थांबले. 



  नंतर सदर तरुणीने आजी व भावाला सांगितले की वैयक्तिक कामानिमित्त हिराबाई कन्या शाळेमध्ये जाते असे सांगून निघून गेली दरम्यान चार वाजेच्या सुमारास तरुणीने आई ला फोन लावून सांगितले घरी येते. नंतर तरुणीला संपर्क केले परंतू तिचा फोन बंद आला. फोन बंद आल्याने तिचा शोध नातेवाईक व मुंबईला राहत असलेला आई - वडील यांच्याकडे घेतला असता ते मिळून आली नाही. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.