Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कृषी विद्यालय मध्ये व्यवसाय तंत्रज्ञान दिन साजरा

Responsive Ad Here

मलकापूर

    कै.वसंतरावजी नाईक, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या 109 व्या जयंतीप्रित्यर्थ राबविण्यात येणाऱ्या ‘  कृषी संजीवनी ‘ मोहिमेंतर्गत दी. 29 जुन व 30 जुन 2022 रोजी कृषी तंत्र विद्यालय मलकापूरद्वारा अनुक्रमे प्रगतशील शेतकरी संवाददिन् व शेतिपुरक् व्यवसाय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यात आला.

शेतकरी परिसंवादामधे उपस्थित शेतकऱ्यांनी , आपण कशाप्रक्रारे अडचणनीवर मात करत् शेतीचे उत्पन्न वाढवून उत्पादीत केलेल्या मालाला कशाप्रकारे बाजारपेठ उपलब्ध करून दिली, तसेच आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय विविध योजना यांच्या जोडीने शेती कशी फायद्याची ठरली, याबाबत सविस्तर् चर्चा करण्यात आली. सदर उपक्रमासाठी तालुक्यातील बऱ्याचश्या शेतकऱ्यांचा पतिसाद लाभला. शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञानदींनी, विद्यालयाच्या द्वितीय वर्ष विध्यार्थ्यांनी घिरणी येथील शेतकऱ्यांना कुक्कुटपालनाविषयीं माहिती दिली.


    शेती व्यवसायात अनिश्चितता असल्यामुळे शेतीबरोबरच जर शेतकरी पासुपालन, कुक्कुटपालनाकडे वळले तर त्यांच्या मिळकतिमध्ये 30- 50% वाढ होऊ शकते.भारतीय शेतीच्या बाबतीत पशुन्ना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. शेतीसाठी सहाय्यक म्हणून पशुचा वापर पुरातन काळापासून केला  जातो. गाई, म्हशी, शेळ्या ई. पशु  दूध व खतासाठी तर बैल, रेडे, उंट ई.मशागतींची कामे करण्यासाठी वापरली जातात. कुक्कुटपालन शेतीला जोडधंदा म्हणून किंवा स्वतंत्र व्यवसाय म्हणूनही करता येऊ शकतो. कुक्कुटपालन प्रामुख्याने अंडी व मास उत्पादनासाठी केले जाते. हे दोन्ही पदार्थ अतिशय पौष्टिक असून उत्तम प्रतीचे प्राथीने, खनिजे व जीवनसत्त्वे यामध्ये असतात. मानवि शरीरास आवश्यक प्राणिजन्या प्रतिन्यांचा पुरावठा यातून होतो.

     याशिवाय इथराही फायदे या व्यवसायातून होतात. कुक्कुटपालनात लवकर सुरु होणारे पक्षांचे उत्पादीत आयुष्य, पिल्लांची खात्रीशीर उपलब्धता, शास्त्रीय दृष्टिकोनातून, पक्षांचे खाद्य व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणी यासाठी वेळोवेळी शासकीय पातळीवरून होणारे कर्ज पूरविन्यासाठी लावचीक धोरण आणी अंड्याची व  मासाची आहारातील वाढती स्वीकृती दिवसेंदिवस वाढत आहे, ह्यामध्ये जात, धर्म, वंश अगर तस्यम गोष्टीचा अडथळा येत नाही व खऱ्या अर्थाने दारिद्रया निर्मूलन व कुपोषण टाळण्यासाठी यांचा हातभार लागत आहे वरील कार्यक्रमासाठी विध्यार्थ्यांना विषयशिक्षक श्री. प्रशांत उबाळे, कृषी सहाय्यक श्री गजानन चव्हाण व विद्याललायच्या प्राचार्या माधुरी आवटे यांचे मार्गदर्शन लाभले.