जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पहुर पेठ अंतर्गत माझी वसुंधरा अभियान भाग तीन व आदर्श त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळ संयुक्त विद्यमानाने येथील समशान भूमी परिसरात तसेच वाघुर नदी तीरावर 100 वृक्षारोपण करण्यात आले.यामध्ये वड पिंपळ देशी प्रजातीचे आंबा निंब आदी शंभर झाडें समशानभूमीवर वाघुर नदी तीरावर लावण्यात आले असून
या कार्यक्रमाप्रसंगी धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा सरपंच पदी रामेश्वर पाटील आदर्श त्रिमूर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष उमेश पाटील शिवसेना शहर संघटक संजय देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते किरण पाटील ग्रामपंचायत सदस्य संदीप बेढे भारत पाटील विकास सोसायटीचे संचालक राजेश लोढा एस व्ही पाटील रामराव देशमुख शांताराम गोंधनखेडे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
