Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक व माजी आमदार चैनसुख संचेतींना किडनॅप करण्याचा तिघांनी केला होता प्लॅन पंरतू दिल्लीतून आयबीने उचलेले!

Responsive Ad Here

 


बुलडाणा 

बुलडाणा जिल्ह्यात खळबळजनक घटना आता समोर आली आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या तिघांना दिल्लीत आयबी ने अटक केली. अटक करण्यात आलेले तिघेही बाहेरचे कुठलेही नसून ते  तिघेंही बुलडाणा  शहरातील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. त्या तिन्ही आरोपींना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली असून श्रीमंत होण्यासाठी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुखी संचेती यांना किडनॅप करण्याचा प्लॅन तिघांनी रचल्याचे समोर आले. बुलडाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी तशी माहिती दिली आहे.


     मिर्झा आवेज बेग (वय २१), शेख साकीब शेख अन्वर (वय २०), उबेद खान शेर खान (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते बुलडाणा शहरातील शेर-ए-अली चौकातील राहणारे आहेत. तिघेही काही दिवसांआधी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला. बॅक लुटण्यासाठी त्यांनी एक एअर गन विकत घेतली.  बँक लुटल्यानंतर कार खरेदी करायची, ऑफिस बनवायचे आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीला किडनॅप करून् कोटयवधी रूपये कमवायचे असा प्लॅन त्यांचा होता. दरम्यान दिल्लीत आयबी पोलिसांनी संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेतले. बुलडाणा पोलिसांना या प्रकरणाची माहिती देऊन त्यांना बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशी दरम्यान राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांना किडनॅप करण्याचा त्यांचा प्लॅन होता असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिघांविरूद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई केली  आहे.