असलम परवेज:बुलढाणा
बुलढाणा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 येथे सोमवार दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी विविध सह-शालेय उपक्रमामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार-सन्मान सोहळा पार पडला.यावेळी नगरपालिका बुलढाण्याचे मुख्याधिकारी गणेशजी पांडे, जिल्हा परिषद प्राथमिक उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, गुड इवनिंग सिटीचे संपादक रणजितसिंग राजपूत, तहसीलदार पाटील इत्यादींची उपस्थिती लाभली.
आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे नेहमीच चर्चेत असणारी शिस्तप्रिय नगरपालिकेचे हि शाळा आपल्या कारकीर्दगीमुळे अग्रेसर स्थानबद्ध असताना दिसते. शाळेमध्ये मागील पंधरवड्यात मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये "आजादीचा अमृत महोत्सव" या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी,भाषण संभाषण स्पर्धा इत्यादीचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बाजावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीसे देण्याचे मुख्याध्यापक काझी रईसोद्दिन यांनी आश्वासित केले होते. घोषित केलेले बक्षीस आपल्यालाच मिळावे ह्या हेतूने विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
निबंध स्पर्धामध्ये अलीना शरीफ खान, मर्जीया मुजीबुर्रहेमान आणि मोहम्मद शर्जिल मोहम्मद अलीम यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. चित्रकला स्पर्धेमध्ये अनाबिया तहेरीन शेख फिरोज, जारा खान जावेद खान, इशारा शेख आसिफ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळेस सत्कार व सन्मान करण्यात आला. यामध्ये शेख जिदान शेख जमीर, मिजबानूर हारून खान, अश्मीरा माहीन सय्यद इमरान,अरशिया असलम खान, शेख अयान शेख असलम, जेबा आणि जैनब यांना गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.
न. प.प्रशासन अधिकारी संजय जाधव आणि मुख्याध्यापक काजी रईसोद्दिन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका शाळा क्रमांक २, चे सर्व शिक्षक शिक्षिकांनी परिश्रम घेऊन या कार्यक्रमाला यशस्वी केल.
