जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना रसकट हेक्टरी पस्तीस हजार रुपये शासकीय मदत मिळाली या मागण्याची निवेदन जामनेर तहसीलदार यांना सादर केले या निवेदनात गेल्या दोन महिन्यात कमी प्रजन्यमान व सध्या ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन मका ज्वारी व कपाशी पिकें अक्षरशा सडली असून पिकावर कोण उगवले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घात निसर्गाने हिरावून घेतला आहे त्यांच्या पेरणीचा मशागिता खर्च पाण्यात गेला असून शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे आकाश झाला असून निराशाच्या गतैत सापडला आहे अशावेळी शेतकऱ्यांना उभे राहण्यासाठी शासकीय मदतीची गरज आहे म्हणून जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट 35 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी अशा मागण्याचे निवेदन येथील नायक तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांना देण्यात आले प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड दिगंबर पाटील प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत संदीप पाटील माधव चव्हाण विनोद माळी अंनिस शेख प्रदीप लोढा ईश्वर बारी राजू जेंटलमेन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
