Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मलकापूर डीबी पथकाची कारवाई पाच महिन्यापासून फरार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

Responsive Ad Here

  


  मलकापूर प्रतिनिधी संजय वानखेडे

    5 महिन्यांपासून फरार असलेला चोरी , घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार मलकापुर पोलीसांकडुन अखेर जेरबंद डी . बी . पथकाची कारवाई पोलीस स्टेशन बोराखेडी ता . मोताळा येथील स.पो.नि. विकास पाटील यांनी काही दिवसापुर्वी स.पो. नि . सुखदेव भोरकडे मलकापुर शहर यांना फोनव्दारे कळवीले होते की , बोराखेडी पो.स्टे . ला दाखल गुन्हा . क्रं . 267/2022 कलम 461,380,34 भा.द.वि. प्रमाणे कृषी दुकानाचे शटर तोडून ऐन पेरणीचे वेळी सुमारे 4 लाख 50 हजार रु . कि . चा कृषी मुद्देमाल चोरुन नेल्याच्या गुन्हयातील एक आरोपी नामे आरीफ खान कौसर खान वय 25 वर्ष हा मलकापुर शहर हद्दीतील राहणारा असुन तो गुन्हा घडल्यानंतर काही दिवस गाव सोडुन पळुन गेला होता . मात्र मागील काही दिवसांपासून तो मलकापुर शहरात ये जा करीत आहे . 

   त्यामुळे तो मिळुन आल्यास त्याला पकडुन घ्या आम्हाला त्याला गुन्ह्यात अटक करावयाची आहे असे कळविले होते . तेव्हा सदर माहीती पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजपुत यांना दिली असता त्यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर डी.बी. पथकाचे स.पो.नि.सुखदेव भोरकडे आणि डी.बी.टिम सदर आरोपीवर पाळत ठेवून होते . आज दिनांक 22/10/2022 रोजी दुपारी सदर फरार आरोपी एका ठिकाणी आला आहे व तो तेथुन लगेच जानार आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने सापळा रचुन डी.बी. पथकाने आरोपीतास जेरबंद केले आहे . सदर आरोपीतावर याआधी चोरी , घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहेत . तदनंतर बोराखेडी पो.स्टे चे स.पो. नि . विकास पाटील यांना आरोपी पकडल्याबाबत माहीती दिल्यावर त्यांनी मलकापुर शहर पोलीस स्टेशनला पाठविलेल्या पो.हे.का. आबिद शेख , ना.पो. का . शिवाजी मोरे , पो . का . इंगळे यांचेकडेस पुढील कारवाईकामी सोपविले आहे . 

   सदरची कार्यवाही मा . सारंग आवाड साहेब पोलीस अधिक्षक बुलडाणा , मा . श्रवण दत्त अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव , मा . अभिनव त्यागी सा उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर , मा . विजयसिंह राजपुत पोलीस पोलीस निरीक्षक साहेब पोस्टे मलकापुर शहर याच्या सुचना व मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी सपोनि सुखदेव भोरकडे सोबत पोका. ईश्वर वाघ , पो.का . संतोष कुमावत , पो.का .प्रमोद राठोड , पो.का. आसिफ शेख , पो . का . अनिल डागोर , पो.कॉ गोपाल तारुळकर यांनी केली .