राहुल संबारे बेलाड
बेलाड गावातील रस्त्याची दुरावस्था , व नागरीकांचे प्रचंड हाल गावाला वारसदार पण गाव मत्र बेवारस बेलाड गावातील वार्ड क्र. 1 मधील टावर गल्ली कडे राहणार्या नागरीकांचे होत आहेत प्रचंड हाल वार्ड क्र. 1 मधिल नागरीकांना ये जा करण्यासाठी असणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला तिथे ग्रामपंचायत बेलाड ने मुरुम पण टाकला नाही आणी सर्वात मोठी समस्या ती पाण्याची वार्ड क्र. 1 मधिल टावर गल्ली कडे नळाला पाणी नसल्यामुळे डोक्यावर पाणी आणावे लागते व रस्त्यामधील ईलेक्ट्रीक खांबवर लाईट ची व्यवस्था ही नाही त्यामुळे रात्री अपरात्री अंधारातून आपला जिव धोक्यात टाकून ये जा करावी लागत आहे.
नेते मंडळी निवडणूक झाल्या नंतर फिरकली पण नाही. नागरीकांनी भरावा तो फक्त करच का ❓ आणी सुविधा मात्र नेत्यांना. त्यामुळे बेलाड गावातील नागरीकांना प्रश्न पडलाय की आता गरीब लोकांना न्याय मिळणार की नाही. वार्ड नंबर 1 मध्ये रस्त्याचं नळांचं व लाईनचा खूप प्रॉब्लेमम असल्यामुळे येथील नागरीकांना लवकरात लवकर मदत करून बंदोबस्त करून देण्यात यावा अशी मागणी गावातील गावकरी करत आहेत.
