अपरेश तुपकरी
काल मलकपूरमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.स्नेहा कोलते या चाळीस बिघा परिसरातुन जात असताना त्यांना एका कुत्र्याच्या पिल्लाचा विव्हळण्याचा आवाज आला. ते पिल्लू एका खोल नालीत पडलेलं होतं,तेव्हा त्यांनी कुठलाही स्वतःच्या स्टेस्ट्स चा विचार न करता फक्त एक जीव वाचावा म्हणून विचार न करता त्याला अक्षरशः स्वतः नालीतून काढण्याचा प्रयत्न केला,ते पाहून त्यांच्या मदतीसाठी परिसरातील इतर ही महिला त्या ठिकाणी आल्या.
विजय हिंगणकर तेथून जात होते त्यावेळेस मॅडम ने मला आवाज दिला व विजय हिंगणकर आणी कोलते मॅडम ने मिळुन त्या कुत्र्याच्या पिल्लाला शेवटी अथक प्रयत्नानंतर ते पिल्लु बाहेर काढू शकलो त्यावेळेस तिथे शहरातील प्रसिध्द फिजिशियन डॉ राजेंद्र फिरके सरही उपस्थित होते.
आज शहरातील एक लिडिंग गायन्याकॉलॉजिस्ट असून आपल्या कुठल्याही स्टेट्सचा किंवा त्या नालीत पडलेल्या पिल्लाचा किळस न करता फक्त एक माणुसकी म्हणून प्रयत्न करणाऱ्या मातृशक्तीला खरंच मनापासून सलाम
