जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला . शाळेच्या प्रांगणात झालेल्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भुषविले . प्रारंभी विद्यार्थ्यांनीनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले . यावेळी सरस्वती देवी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले .
याप्रसंगी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किर्ती बाबुराव घोंगडे ( जि . प . कन्या शाळा पहूर कसबे ) , जिनीयस मास्टर्स फाऊंडेशन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमती रत्नमाला काथार ( संतोषीमाता नगर जि . प . शाळा ), गोपाळ सपकाळ ( जि . प . शाळा , खर्चाणे ) तसेच आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार प्राप्त विजय सरोदे , पीएचडी पदवी प्राप्त डॉ . ज्योती फकीरा चौधरी ( आर . टी . लेले हायस्कूल ) , तायक्वांदो स्पर्धेत प्रथम विजेतेपद प्राप्त हरीभाऊ राऊत ( सावित्रीबाई फुले विद्यालय ) या नवोपक्रमशील शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
यावेळी गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार , माजी जि . प .कृषी सभापती प्रदीप लोढा , रामचंद्र वानखेडे , रूपाली माळी आदिंनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक केंद्र प्रमुख भानुदास तायडे यांनी केले , या वेळी जि . प . सदस्य राजू पाटील शहापूर , पं . समिती सभापती जलील तडवी शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे, उपसभापती पूजा भडांगे , पहूर पेठच्या सरपंच नीता पाटील , कसबेच्या सरपंच आशा जाधव , चंद्रकांत बावस्कर , नवल राजपूत , एस . एस . गावंडे , उपसरपंच शाम सावळे , राजू जाधव , लक्ष्मण गोरे , शंकर जाधव , मधुकर पवार , ग . स . सोसायटीचे संचालक अनिल गायकवाड , सलीम शेख , पत्रकार शरद बेलपत्रे , किरण जाधव ,एन . पी . जोहरे , मधुकर लहासे , संतोष पाटील , विनोद पाटील , आदी मान्यवरांची उपस्थिती होती .
यशस्वीतेसाठी सुनिल कोळी , श्रीकांत पाटील , गणेश राऊत , रमेश पाटील , ज्ञानेश्वर चौधरी , हितेंद्र जाधव , निलेश गोरे , प्रकाश घोंगडे यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षकांनी सहकार्य केले . सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले . माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनी आभार मानले .
