Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तहसील कार्यालयातून ट्रॅक्टर चे सामान गेले चोरीला

Responsive Ad Here

अपरेश  तुपकरी प्रतिनिधी

   अवैध रेती वाहतुक प्रकरणी तहसीलदार कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर क्रमांक MH 32 /10098 तहसील कार्यालयात उभा केला असता त्यातील बॅटरी ,जॅक ,सेल स्टार्टर असे 25000 रुपये चे सामान चोरीस गेले असून ट्रॅक्टर व त्याच्यातील सामानाची जबाबदारी तहसीलदार व त्यांच्या कार्यालयाची आहे. भविष्यात आणखी काही सामान चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ट्रॅक्टर मधील आणखी सामान चोरीला गेल्यास तहसीलदार व कार्यालय जबाबदार राहील अश्या आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते  अमजदखान हनिफखान यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना दिले आहे. 



        याबाबत सविस्तर वृत्त असे की अमजदखान यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक MH32-0098 सन 2020 रोजी रॉयल्टी नुसार रेती वाहतूक करताना पटवारी व कोतवाल यांनी पकडून निवासी नायब तहसीलदार श्री  गजानन राजगडे यांच्या ताब्यात दिला होता. मात्र रॉयल्टी चि कोणतीही चौकशी न करता सदर ट्रॅक्टर अवैध रेती वाहतुक करत असल्याचे सांगून जप्त  करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला होता. 

              सदर ट्रॅक्टर चि सुनावणी दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी असल्याने तहसील कार्यालयात आपल्या ट्रॅक्टर चे अवलोकन करण्याकरिता अमजदखान गेले असता त्यांना ट्रॅक्टर चि बॅटरी, जॅक, आणि सेल स्टार्टर गहाळ झाल्याचे आढळून आले, म्हणुन त्यांनी उपविभागीय अधिकारी यांचे कडे सदर सामानाची चोरी झाली असल्याचे निवेदन दिले असून भविष्यात आणखी सामान चोरी होण्याची शक्यता व्यक्त करत सदर घटनेला आपणच जबाबदार राहाल अशा आशयात आपला रोष प्रकट करत निवेदन दिले.