असलम परवेज: लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार येथील नवी नगरी भागात माजी नगरसेवक तथा समाजसेवक अब्दुल उबेद अब्दुल मुनाफ, हाजी एम.ए नसीम सर, रहेमान भाई, असलम खान, वहिद खान, डॉक्टर मस्तान खान आणि हाजी अफसर खान यांच्या संक्पनेतून ईद मिलादुन्नबी निमित्ताने लंगर भोजनाचे आयोजन करण्यात आले. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त देशभरात ईद ए मिलाद हा सण साजरा केला जातो. यंदा हा सण रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा करण्यात आला.
'ईद' या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. पैगंबर मोहम्मद यांनी नेहमी या जगाला शांततेचा संदेश दिला, म्हणून हा दिवस जगपातळीवर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच इस्लाम धर्मात दान करण्याला मोठं महत्व आहे महणून ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने या दिवशी अनेक उपक्रम राबविले जातात तसेच गरिबांमध्ये अन्नदान केलं जातं. त्या अनुषंगाने लोणार येथील ईद-ए-मिलादुन्नबीची भव्य रॅली संपल्यावर या लंगर जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
प्राचार्य अब्दुल अकील सर, शमशेर भाई, शमशोकमर, शेख ताहेर, शेख रफिक, शेख शेख कासिम,शेख खलील, शेख जावेदलाल, यांनी नियोजन बद्ध पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आखली. तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता रौशन खान, शेख कलीम, अहमदनुर भाई, फिरोज खान, मोबीन खान, लालाभाई, रशीद खान, शेख मुजाहिद, मोहम्मद सादिक शेख इरफान, शेख वसीम, अमीर भाई कौसर चाचू , अय्युब भाई सोबतच इतर मित्र मंडळींनी परिश्रम घेतले.
