जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीने मालमत्ता धारकांचे.कंबरडे मोडणारी लावलेली घरपट्टी, इतर करवाढ तसेच एकतर्फी बनवलेला विकास आराखडा,ग्रीन झोन मध्ये समाविष्ट केलेल्या शेतजमिनी यासंदर्भात राष्ट्रवादी चे नेते संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वाखाली शेंदुर्णी नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अन्यायकारक करवाढ, ग्रीन शेती यासंदर्भात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी संजयदादा गरुड ,माजी सरपंच सागरमल जैन, पत्रकार विलास अहिरे यांनी आपल्या भाषणात नगरपंचायतीने वाढवलेली घरपट्टी, तीन किलोमीटरवर परिसरात ग्रीन झोन म्हणुन शेतीचा केलेला अंतर्भाव यामुळे शेतकऱ्यांचे भविष्यात होणारे नुकसान तसेच एकतर्फी बनलेला विकास आराखडा, इतर वाढीव कर रद्द करण्यात येऊन जनतेला दिलासा मिळाला पाहिजे अन्याय तीव्र आंदोलन पुकारले जाण्याचा इशारा दिला. या संबंधीचे निवेदन मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांना देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे उपस्थित होते.
यावेळी डॉ. किरण सुर्यवंशी, राजेंद्र पवार, सुधाकर बारी,शांताराम गुजर,विश्वनाथ ओव्हाळ,नंदकिशोर बारी,भगवान अहिरराव, योगेश गुजर,शकुर शेख,सिद्धेश्वर पाटील,प्रविण गरुड, किशोर भावसार, धनंजय गरुड तसेच नागरिक व्यापारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)