जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथे जिल्हा परिषद कसबे शाळेत शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भानुदास रामकृष्ण तायडे हे होतेशिक्षण परिषदेत दिलेल्या विषया पैकी जीवन कौशल्य भाव भावनांचे व्यवस्थापण यावर आ. श्री केंद्र प्रमुख भानुदास तायडे यांनी विद्यार्थी विषयी असलेल्या भावना समजून घेणे त्यावर असलेले वर्तन याविषयी ऊत्कृष्ट माहिती दिली.
श्री. हितेद्र जाधव सर यानी शालेय स्पर्धा परीक्षाची तयारी इयत्ता पाचवी व आठवी यावर आधारित अनेक कृप्त्या व सुत्रे यांची माहिती दिली. चला तंत्रस्नेही होऊया अंतर्गत गुगल लिंक महत्त्व व कशी तयार करावी याची माहिती देऊन प्रत्येकाकडून डेमो तयार करून सादर करण्यात आली. स्थानिक गरजा नुसार प्रशासकीय विषय श्री. विष्णू काळे शालेय पोषण आहार अधिक्षक जामनेर यांनी दिले शिक्षण परिषदेची आयोजन शाळा आर बी आर कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. महाजन सर, सुत्रसंचालन श्रीमती सुनंदा साळुंखे मॅडम यांनी केले. श्री. गणेश राऊत सर यांनी आभार मानून शिक्षण परिषदेचा समारोप करण्यात आला.
.jpg)