![]() |
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात आवळल्या मुसक्या |
.जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर -सोनाळा शिवरस्त्यावर काल शिंगायत येथील तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणी गावातीलच एका तरुणाच्या जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात मुसक्या आवळल्या . दारूच्या नशेत काल ( ता . २ १ ) शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू भगवान वाघ याची दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली होती . याप्रकरणी पोलीस अधीक्षक एम . राज कुमार , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , चाळीसगाव विभागाचे रमेश चोपडे , सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख ,
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील , पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे , सहाय्यक फौजदार युनूस शेख , पोहेका महेश महाजन , लक्ष्मण पाटील , संदीप सावळे , किशोर राठोड , रणजीत जाधव , सचीन महाजन ईश्वर पाटील , लोकेश माळी , रमेश जाधव यांच्या पथकाने अवघ्या २४ तासात शिंगायत येथील रविंद्र उर्फ बाळू भगवान हडप यांस शिंगायत येथून ताब्यात घेतले असून उद्या त्यास जामनेर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे . पहूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी मयताचे काका सुभाष सुखदेव वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत .
मद्यपींमध्ये झाला वाद
मारेकरी आणि मयत दोन्ही मध्ये परस्पर मित्रत्वाचे संबध होते . दोघांनी दारू पिल्यावर वडापाव वर ताव मारला . दारूच्या नशेत दोघांमध्ये शाब्दिक वाद उफाळला . वादाचे पर्यावसान भांडणात झाले . मयताने आरोपीस काठीने मारहाण केली . याचा राग येऊन रवींद्रने त्याच्या डोक्यात दगड घातला . यात प्रमोद रक्ताने माखल्या गेला . घाबरलेल्या अवस्थेत रवींद्रने पुन्हा दोन घाव प्रमोदच्या डोक्यात घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला . मारेकऱ्याने १५ फूट अंतरावर मृतदेह फरफटत नेवून त्याचा मोबाईल व मोटर सायकल घेऊन पलायन केले .आरोपीच्या मोबाईल मधील तांत्रिक लोकेशन वरून तपास पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या .
