Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रिदा फातेमा डॉ.बाजीगअली सिद्दिकी 97% गुणा सह लोणार तालुक्यात प्रथम

Responsive Ad Here


सीबीएसई च्या १०वी परीक्षेत मुलींची बाजी; गणित आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये प्रत्येकी १०० पैकी ९९ गुण

असलम परवेज;लोणार तालुका प्रतिनिधि

|लोणार| केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) तर्फे आयोजित फेब्रुवारी २०२३ दहावी परीक्षेचे निकाल १२ मे २०२३ रोजी घोषित झाला आहे. यामध्ये लोणार येथील डॉ.बाजीगअली सिद्दिकी आणि डॉ. सीमा सिद्दिकी यांची मुलगी रिदा फतेमा हिने ९७% गुण घेऊन आपल्या शाळेतच नव्हे तर लोणार तालुक्यात प्रथम स्थान पटकावले आहे. रिदा लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलची गुणवंत विद्यार्थिनी असून तिचे डॉक्टर होऊन समाज सेवा करण्याचे स्वप्न असल्याचे तिने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

            रिदा फातेमा हिला गणित आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयांमध्ये विशेष आवड असल्याचे समजते. त्यामुळे रिदा ने गणित विषयांमध्ये १००गुणा पैकी ९९गुण आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ९९गुण मिळवले आहे तसेच इंग्रजी भाषामध्ये ९७गुण, समाज शास्त्र ९५गुण, हिंदी भाषा ९५ गुण तर विज्ञान मध्ये ९४गुण प्राप्त करुन घवघवीत यश मिळविले आहे. 

              लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलचे अध्यक्ष हाजी शेख मसूद शेख उस्मान, सर्व संस्था चालक मंडळ, प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी व उपप्राचार्य नबील शेख यांनी रिदा फातेमा सोबतच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला आहे. 

परिवारासह शिक्षकांना दिले आपले यशाचे श्रेय

            रिदा हिने आपल्या यशाचे श्रेय देतांना सांगितले की, तिच्या या घवघवीत यशामागे तिच्या डॉक्टर आई-वडिलांची प्रेरणा होती, तर तिन्ही काका व काकूंची शाबासकीची थाप तिच्या पाठीशी नेहमीच असायची आणि आजी व आजोबा मुशताकअली सिद्दिकी यांचा भरभरून आशीर्वाद राहायचा,म्हणूनच ती दणदणीत यश प्राप्त करू शकले आणि डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहू शकले.

            यासोबतच त्यांनी आपल्या शाळेचे प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी, उपप्राचार्य नबिल शेख, गणित शिक्षिका सरला कुलकर्णी, इंग्रजी विषयाचे शिक्षक पारवे सर, हिंदी शिक्षक गणेश राठोड सह शिक्षिका सुजाता कापुरे, योगेश वानवे आणि सतीश राठोड यांनाही आपले यशाचे श्रेय समर्पण केले आहे. 

        या वेळी तिच्या वडिलांचे परममित्र डॉक्टर सय्यद ताहेर सय्यद गुलाब यांनी रिदाच्या या यशाबद्दल रिदा सह तिच्या आई-वडिल, आजी- आजोबा आणि पूर्ण परिवाराला शुभेच्छा दिल्या आहेत तसेच तिच्या उज्वल भविष्य आणि उदंड आयुष्याची कामना केली आहे.