Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे लोकार्पण

Responsive Ad Here


जामनेर प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जामनेर चे लोकपर्ण जामनेर नगरी च्या प्रथम  लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

सर्वांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने शहरी भागात शासनाकडून या दवाखाण्याद्वारे आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. सदर केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स,आरोग्य सेवक व मदतनीस असणार आहे.या दवाखान्याच्या माध्यमातून बाह्य रुग्ण सेवा,बी.पी.,

डायबेटीस,तीन प्रकारचे कॅन्सर यांचे निदान करून  तद्य डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत औषधोपचार  करण्यात येणार आहे. गरोदर मातांच्या सेवा व नियमित लसीकरणासाठी या दवाखान्याचा उपयोग होणार आहे.याठिकाणी महिन्यातुन एक वेळा नेत्रतपासणी करण्यात येणार आहे.लवकरच या ठिकाणी अत्याधुनिक साधनसामुग्री व अधिक प्रमाणात औषधी पुरवठा होणार आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत व डॉ.दानिश खान यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाटील यांनी तर आभार तालुका पर्यवेक्षक बशीर पिंजारी यांनी केले सुत्रसंचालन आरोग्य सहाय्यक रवीद्र  सूर्यवंशी यांनी केले.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे व जामनेर न.पा. चे गटनेते डॉ.प्रशांत भोंडे यांनी सदर प्रसंगी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम प्रसंगी श्रीराम महाजन,बाबुराव हिवाळे,अतिक झाल्टे,किरण पोळ,दीपक तायडे,दीपक महाजन,रवींद्र झाल्टे,सुभाष पवार,दीपक कचरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.दानिश खान,डॉ.कांचन पोळ,आशा कुयटे,गोपाळ पाटील,किशोर पाटील,पुंडलिक पवार,ज्ञानेश्वर महाले सर्व आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका व मोठ्या संख्येने नागरिक उपस्तीत होते.