Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुक्यातील वादळी वाऱ्यांसह गारपीटी

Responsive Ad Here


जामनेर तालुक्यातील काल सायंकाळी वादळी  वाऱ्यांसह गारपीटीच्या तडाख्यात 135 मेंढ्यांचा जागीच मृत्यू तर 75 मेंढ्या धरणात वाहून गेल्या,अनेक घरांची पघझड, शेती पिकांचे प्रचंड नुकसान, नामदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अमित मित्तल, तहसीलदार अरुण शेवाळे यांची घटनास्थळी भेट

जामनेर (प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील शहरासह

 पहूर  परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी गारपीट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या तडाख्यात परिसरातील जामनेर मार्गावरील सोनाळा फाट्याजवळ नांदगाव येथून आलेल्या शेतात बसलेल्या मेंढपाळांच्या सुमारे 135 मेंढ्या गारपीटीच्या तडाख्यात मृत्युमुखी पडल्या असून 75 मेंढ्या धरणात वाहून गेल्याचे सांगण्यात आले.

  याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या पाच ते सहा दिवसापासून परिसरात तसेच पिंपळगाव गोलाईत शिवारात खोकर तळा या ठिकाणी शेतकरी देवराज राजाराम पाटील, यांच्या शेतात बानगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील भगवान सदाशिव गोळेकर, सिताराम सदाशिव गोळेकर, प्रल्हाद सदाशिव गोळेकर, शांताराम सदाशिव गोळेकर, अरुण सदाशिव गोळेकर, पंकज सदाशिव गोळेकर या सहा मेंढपाळ बांधवांचे असून काल सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या गारपीट चक्रीवादळ व अवकाळी पावसाच्या तडाख्यात त्यांच्या वाड्यातील 800 ते 900 मेंढ्या असून त्यापैकी 135 मेंढ्या गारपिटीच्या तडाख्यात मृत्युमुखी झाल्या तर 75 मेंढ्या शेजारी असलेल्या नाल्यातून वाहून गेल्याचे सांगण्यात आले असे एकूण 30 ते 35 लाखांचे नुकसान झाल्याचे भगवान गोळेकर या मेंढपाळ बांधवाने सांगितले. यावेळी सोनाळा येथील आपत्कालीन कार्यकर्ते सागर पाटील, अमोल सुरसे, प्रशिक इंगळे, तुषार पगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेंढपाळ बांधवांना मेंढ्या वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करून  मेंढ्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे दीडशे ते 200 मेंढ्या वाचविण्यात त्यांना यश आले ,दरम्यान या मेंढपाळांचा काल सायंकाळपासून ते आज सायंकाळपर्यंत तब्बल 24 तासात त्यांचा संसार पूर्णपणे उध्वस्त झाला असून यात त्यांचे घरातील सर्व खाण्यापिण्याच्या साहित्यासह संसार उपयोगी वस्तू या सर्व वाहून गेल्या त्यामुळे आज त्यांचा संसार उध्वस्त झाला असून पहूर तसेच सोनाळा परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करून जेवणाची व्यवस्था केली यात प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, पत्रकार गणेश पांढरे, सरपंचपदी रामेश्वर पाटील, पिंपळगाव गोलाईतचे सरपंच  संदीप पाटील यांनी जेवणाची नाश्त्याची आणि पाण्याची तातडीने व्यवस्था करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

   घटनास्थळी सोनाळा येथील तलाठी धीरज जैन, पहुर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जयलाल राठोड जळगाव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सदाशिव शिसोदे, तहसीलदार अरुण शेवाळे यांनी तातडीने मेंढ्यांचे शवविच्छेदन करून पंचनामा केला.

   घटनास्थळी नामदार गिरीश महाजन जिल्हाधिकारी, अमित मित्तल यांनी घटनास्थळाची पाहणी करून मेंढपाळ बांधवांची तसेच मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांची पाहणी करून आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले की या सर्व पंचनामे करून शासकीय स्तरावर गारपीटीच्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रतिमेंढी चार हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात येणार असल्याचे सांगितले ,येत्या तीन ते चार दिवसात पहुरसह परिसरातील सर्व नुकसान झालेल्या शेतीचे पिकांचे तसेच घरांची पडझड झालेल्या या सर्वांचे पंचनामे येत्या तीन ते चार दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले ,तसेच सर्वांना शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  पहूर पेठ येथील प्रगतीची शेतकरी  साहेबराव देशमुख ,चरण पाटील, यांच्या केळीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विजय भागवत पाटील या शेतकऱ्यांचे ही घरावरील पत्रे उडाल्याने घरात असलेल्या कपाशीचे प्रचंड नुकसान झाले गाव परिसरात अनेक ठिकाणी मका कपाशी , भाजीपाला यांचे अतोनात नुकसान झाले आहे याच प्रामुख्याने सर्वाधिक नुकसान मक्का, केळी, ज्वारी, बाजरी ,टरबूज यासह भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे तसेच अनेक घरांची दुकानांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. 100 पेक्षा जास्त विजेचे खांब तसेच विद्युत रोहित कोसळल्याने पाऊस परिसरातील 20 पुरवठा काल सायंकाळपासून आतापर्यंत वीस पुरवठा खंडित झाला आहे दुरुस्तीसाठी  महावितरणचे कर्मचारी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असून त्यांना जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे एटीएम सुविधा पीठ गिरण्या झेरॉक्स तसेच पिण्याचे पाणी इंटरनेट सुविधा या सेवाविषयक झाले आहे

   प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास सुरुवात केली खरी पण प्रत्यक्षात त्यांना झालेल्या नुकसानीचे भरपाई केव्हा मिळेल हाच खरा मोठा प्रश्न आहे

  मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा या ऊक्ती प्रमाणे अनेकांचे संसार मोडून पडले असले तरी माणुसकी जागवत अनेक हात पुढे येत आहेत .