Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नैतिक अधःपतन रोखण्यासाठी बालसंस्कार शिबीर महत्वाचे--महेंद्र कराळे

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारीया 

          आज समाजातील नीतिमत्ता पार तळाला गेली असून वैयक्तिक स्वार्थासाठी पशूलाही लाजवेल असे दुष्कृत्य  मानव करत आहे अश्या विपरीत परिस्थितीत नैतिक अधःपतन रोखण्यासाठी बाल संस्कार शिबीर अतिशय महत्वाचे आहे असे प्रतिपादन महेंद्र कराळे सर यांनी ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथील बालसंस्कार शिबिरात बोलतांना केले.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की शाळेमध्ये फक्त विषयांचे शिक्षण दिले जाते.ज्या विषयाचा निकाल जास्त लागेल तो शिक्षक किंवा ज्या शाळेचा निकाल जास्त लागेल ती शाळा उत्कृष्ट असे समजल्या जाते पण या सर्व चढाओढीत विद्यार्थ्यांचे गुण जरी वाढत असले तरी गुणवत्ता मात्र घसरत आहे 

    विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी व त्याच्यातील पशुत्वाचा लोप करून मनुष्यत्वच्या गुणांचे रोपण करण्यासाठी बालसंस्कार शिबिराला पर्याय नाही.वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ संप्रदाय असून यात कोठलीही अंधश्रद्धा किंवा कर्मकांड नसून समानतेचा संदेश देणाऱ्या या वारकरी संप्रदायातील ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरातील सर्व विद्यार्थी उत्तम गुण संपन्न नागरिक बनतील असाही आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला.यावेळी सौन्दळा येथील विलास अरबट हे उपस्थित होते.असे ज्ञानेश्वर महाराज भालतिलक यांनी कळविले