हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारीया
वैश्विक पातळीवर बाप लेकीच्या नात्यासारखे पवित्र व निष्काम नाते दुसरे कोणतेही नाही. कारण इतर सर्वच नात्यांमध्ये कुठलाना कुठला स्वार्थ असतोच . मुलांच्या शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्यांला बापाला हे नक्की माहीत असते की ! उद्या आपला मुलगा पाण्याचा पैसा करणार आहे. परंतु मुलीला शिकवताना मात्र कुठलाच स्वार्थ नसतो. किंबहुना तो आपल्या मुलीवर आजन्म निष्काम प्रेम करीत असतो. त्या नितांत प्रेम करणाऱ्या बापाच्या निष्काम प्रेमाचे मुल्य न कळल्याने केवळ तात्कालिक शारिरीक आकर्षणातून निर्माण झालेल्या स्वार्थी वैषयीक प्रेमापोटी त्या बापाला सोडून जाणाऱ्या मुलींनो आपल्या वडिलांना शास्त्रदत्त कन्यादानाच्या अधिकारापासून वंचित करू नका असे कळवळपुर्ण आवाहन नवोदित कीर्तनकार कु. श्वेताताई क्षिरसागर यांनी केले.
त्या आज श्री ज्ञानभास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द द्वारा श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरात बहूसंख्येने सहभागी मुलींना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की ! साळंकृत कन्यादान l पृथ्वीदानाच्या समान ll तु. म . अलंकारा सहित केलेले कन्येचे दान हे पृथ्वीदानाचे पुण्यप्राप्ती करून देणारे असुन,आज मात्र अनेक बाप त्या पुण्या पासून वंचित राहत आहेत ही खुप मोठी खेदाची बाब आहे. ज्या बापानी आपल्या जग दाखविले त्याला आपल्या कुठल्याही कृतीने समाजात मान खाली घालून जगावे लागू नये वा आत्महत्या करण्याची पाळी येऊ नये असे आवाहन त्यांनी केले असे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.
