हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारिया
मनुष्येत्तर प्राणिमात्रांमध्ये आहार , निद्रा, भय आणि मैथुनादिक्रिया समान असुन ; मनुष्य देहामध्ये मात्र ज्ञान हा विषेश गुण असतो. तेच ज्ञान हे मानवी जीवनोध्दारा करिता कारणीभूत होत असुन ; प्रथम त्या मानवी जीवनाचे मुल्य कळण्या करीता बालसंस्काराची गरज असल्याचे प्रतिपादन श्री. भागवताचार्य शिवाजी महाराज टाले यांनी केले .
ते आज श्री ज्ञानभास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द द्वारा गत १७ वर्षांपासून दि.१ मे ते २० मे २०२३ पर्यंत श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराच्या अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.
यामुळे व्यासपीठावर संस्थेचे आश्रयदाते श्रीयुत बाळासाहेब वाटाणे, श्रीरामजी गवई , विनायकराव वाकोडे, बाळूभाऊ चितोडे , हरिदास वाघ ,सहशिक्षक सतिष महाराज कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष तथा शिबिर संचालक ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी करून शिबीर आयोजनाचा उपयोगीता उदघृत करून सांगीतली. प्रथमदिनीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल १८७ मुलामुलींनी प्रवेश घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गौरव महाराज माळी यांनी तर आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक यांनी केले.

