हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारिया
दिनांक २९/०५/२०२३ रोजी श्रीकृष्ण मंदिर गाडेगाव ता.तेल्हारा जि. अकोला येथे श्री शंकरराव किरवे साहेब जि.अ.कृ.अ अकोला, श्री डॉ मुरली इंगळे साहेब प्रकल्प संचालक आत्मा अकोला, मा श्री सुशांत शिंदे उ वि कृ अ अकोट , यांचे मार्गदर्शना खालील कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंञणा (आत्मा) व कृषि विभाग यांचे अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित आला यावेळी श्री नरेंद्र राठोड तालुका कृषी अधिकारी यांनी पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियान ,आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य जन जागृती मोहीम व कृषि विभागातील विविध योजनांची माहीती दिली.श्री चव्हाण साहेब गट विकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, श्री प्रशांत वायझाडे सहायक क्षेत्रीय अधिकारी इफको कंपनी यांनी नॅनो युरिया, नॅनो डी ए पी पि चा वापर कसा, किती प्रमाणात करावा व त्याचे फायदे या बाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच श्री गौरव राऊत मंडळ कृषी अधिकारी यांनी घरचे बियाणे वापर, माती परीक्षण, बिजप्रक्रीया, किड रोग निरीक्षण याविषयावर मार्गदर्शन केले.दिपक मोगरे तालुका तंञज्ञान व्यवस्थापक तेल्हारा यांनी आत्मा योजनेची माहीती, सेंद्रीय , जैविक व नैसर्गिक शेती पि एम एफ एम ई विषयी माहीती दिली श्री विजय राठी प्रगतीशील शेतकरी यांनी त्यांचे अनुभव कथन केले , यावेळी कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री मनोज सारभुकन कृषी सहायक, आभार प्रदर्शन दिपक मोगरे तालुका तंञज्ञान व्यवस्थापक यांनी केले.
