पहुर. ता.जामनेर--येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांची जालना येथे बदली झाली असून काल रात्री त्यांनी पदभार सोडला असून त्यांच्या जागी छत्रपती संभाजी नगर येथून सचिन सानप यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. पहुर पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्याविरूध्द वाँश आऊट मोहीम राबविण्यात आपले प्राधान्य राहील असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.
सचिन सानप यांची २००६मध्ये पोलिस दलात सहा. पोलिस निरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर अहमदनगर शहर, श्रीगोंदा,सोनई तसेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा, वरणगाव येथे सेवा बजावली आहे.
पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथील बेगमपूरा, वेंदातनगर आदी पोलिस ठाण्यात सेवा बजावली असून पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाल्या नंतर जळगाव जिल्ह्यात पहुर पोलिस ठाण्यात प्रथमच नियुक्ती झाली आहे.
