Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हरितवारी - वृक्षवल्ली आम्हा सोयरे...

Responsive Ad Here



 हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारीया 

 या My FM 94.3आयोजीत सीडबॉल तयार करण्याच्या उपक्रमात काल आदर्श कॉलनी, नगर परिषद कॉलनी अकोला येथील सहभाग घेतला.निसर्ग माझा मी निसर्गाचा ही भावना प्रत्येक मानवी मनाची व्हावी या हेतूने माय एफ एम 94.3 च्या वतीने आर. जे. पूर्वा यांनी सहभागी होत सीडबॉल निर्मिती करून निसर्ग प्रेमी समाजाची निर्मिती करण्यात मोठा हातभार लागला.

तयार झालेले सर्व सिडबॉल पावसाळ्यात पंढरपूर वारी मार्गावर दुतर्फा टाकण्यात येणार आहेत. भविष्यात हा वारीमार्ग  हिरवागार असेल त्यात आज अकोला येथे तयार केलेल्या सीडबॉल मधून उगवलेली हजारो झाड नक्कीच असतील.

पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने शक्य असेल तसं पुढे यायला पाहिजे. जल, जमीन, जंगल याची हानी होणार नाही याची काळजी घेतली तर निसर्ग कोपणार नाही हे नक्की. अकोला शहरात हिरवळ फुलवण्याचे कार्य करणारे निसर्गमित्र अजयभाऊ गावंडे, निशिकांत बडगे, पिंटूभाऊ वानखडे, प्रवीण हटकर, प्रा. सुभाष गादिया, माजी नगरसेविका सौ. कल्पना गावंडे, शाम गोटफोडे सर, गणेश मानकर, अमोल गोंडचवर यांचा यानिमित्ताने लाभलेला नैसर्गिक सहवास आनंद देऊन गेला. या पावसाळ्यात सर्वांनी वृक्ष लागवड करावी ही विनंती. --तुळशिदास खिरोडकार