गोवंश तस्करांवर हिवरखेड पोलिसांची कारवाई सुरूच
हिवरखेड प्रतिनिधी : जितेश कारीया
हिवरखेड पोलिसांना 22 जून 2023 रोजी रात्रीच्या अंदाजे 12 वाजता मिळालेल्या गोपनीय बातमीवरून हिवरखेड पोलिसांनी बगाडा नाल्याचे पुलाखाली नाकाबंदी केली असता अज्ञात आरोपीने गोवंश जातीचे बैल गोरे कत्तली करिता उपाशीपोटी त्यांना निर्दयतेणे मारहाण व जखमी करून घेऊन जात असताना मिळून आला. यातील आरोपी हा अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला असून पोलिसांनी जप्त केलेला गौवंश (1) एक बैल लाल रंगाचा अंगावर पांढरे ठिपके वय अंदाजे 10 वर्ष किंमत अं.15000 रुपये (2) एक गोऱ्हा लाल रंगाचा वय 3 वर्ष किं.अं. 8000 (3) एक गोऱ्ह काल्या रंगाचा वय 3 वर्ष किं.अं.6000 (4 ) एक गोऱ्ह जांभळ्या रंगाचा अंगावर पांढरे ठिपके वय अंदाजे 3 वर्ष किं.अं.6000 रुपये एकुण किंमत 35000 रूपयाचा मुद्देमाल मिळाला असून आरोपीचा शोध हिवरखेड पोलीस घेत आहे.
हि कारवाई ठाणेदार विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर, महादेव नेवारे, धीरज साबळे यांनी केली.
ठाणेदार विजय चव्हाण आणि संपूर्ण हिवरखेड पोलिसांनी गेल्या काही दिवसा पासून गोवंश तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात कंबरच कसली आहे. परिसरातील गोवंश तस्करांची आता खैर नाही हे चित्र आता हिवरखेड पोलीस स्टेशन च्या हद्दीत पाहायला मिळत आहे.
