हिवरखेड;प्रतिनिधी जितेश कारीया
येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.यावेळी प्राचार्या रजनीताई वालोकार, ज्येष्ठ शिक्षक संतोषकुमार राऊत, गणेश खानझोडे, प्रशांत भोपळे, निखिल भड,निलेश कासोटे,गजानन पवार,अंबादास चाफे,निलेश दांडगे आदी शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
