जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील रोटवद शिवारातील जंगलात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास रखवालदारी करणाऱ्या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले रोटवद शिवारातील हिजरा जंगलात रोटवद येथील शेतकरी राहुल सुरेश बोकडे यांच्या शेतात रखवालदारी करणारा शेतमजूर उत्तम परभत भील वय 55 या शेतमजुरावर आपले ड्युटी झाल्याने सकाळी सहा वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना शेतामध्येच पाठीमागून येऊन बिबट्याने मानेवर हल्ला केला उत्तम दिल्याने आरोड ओरड केली असता बाजूच्या शेतात असलेले उदय तुळशीराम गायकवाड व माधव परभत मालते या शेतकऱ्यांनी बिबट्याच्या अंगावर दगडाचा मारा करून बिबट्याला हुसकावून लावले त्यांनी ताबडतोब शेतमालक राहुल बोकडे यांना सविस्तर घटनेची माहिती देऊन गावातील अन्य गावकरी घटनास्थळी बोलावून जखमी उत्तम भील जळगाव येथे ताबडतोब खाजगी वाहनाने सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे
