Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महात्मा गांधी राष्ट्रीय सन्मान 2023" राष्ट्रीय पुरस्काराने शेख अब्दुल रहीम सन्मानित

Responsive Ad Here

असलम परवेज

|औरंगाबाद|       मिडिया चॅरिटेबल फाउंडेशन ऑल इंडिया सातारा या राष्ट्रीय  फाउंडेशनच्या  वतीने 'मेरी माटी, मेरा देश' या उपक्रमांतर्गत तसेच 'मेरी जान तिरंगा' महोत्सवी औचित्य साधून रविवारी दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय पुरस्कार सन्मान वितरण परभणी येथील एम.आय.हॉल येथे समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला.

          मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन ऑल इंडिया साताराच्या वतीने शैक्षणिक अणि समाजिक क्षेत्रात विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल शेख अब्दुल रहीम यांना परभणी येथे  "राष्ट्रीय महात्मा गांधी सन्मान 2023" या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  या भव्य दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि.आर.डी.मगर, उद्घाटक म्हणून आलमगीर लोकसभा उमेदवार वंचित बहूजन आघाडी, विशेष उपस्थिती म्हणून विलास कासुर्डे सातारा येथील प्रसिद्ध उद्योजक,दिलीप गुजर .सी.ई.ओ जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सय्यद गौस गव्ह.कॉन्ट्रॅक्टर,सातारा, जलील पटेल,पवन निकम आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला तसेच सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन शेख अब्दुल रहीम यांना गौरविण्यात आले. शेख अब्दुल रहीम हे पेशाने एक शिक्षक आहे. ते सामजिक संस्था हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनद्वारे विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी अहोरात्र झटत असतात व त्यांच्या मदतीसाठी दिवसरात्र हजर राहतात. तसेच विद्यार्थी-शिक्षकांसाठी वर्षभर अनेक उपक्रम राबवितात.

        त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच असंख्य जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. याची दखल घेत डॉ. कामिनी पाटील (संस्थापक अध्यक्ष: मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन ऑल इंडिया) तसेच संयोजक महमूद खान यांनी शेख अब्दुल रहीमची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली होती.