Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भगवान बाबा कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम संपन्न

Responsive Ad Here


असलम परवेज :लोणार

|लोणार|       स्थानिक भगवान बाबा कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व समजावे म्हणून व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा. ए.टी. कायंदे हे होते आपले विचार व्यक्त करताना प्रा. अशोक कायंदे यांनी "महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत ही संकल्पना विद्यार्थ्या समोर मांडली व सदर कार्य आपल्या घरचे असं समजून करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला." सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.अश्विनकुमार राठोड यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,"भारतात अधिकाधिक आजार हे अस्वच्छतेमुळे होतात तेव्हा आपण आपले घर आपला परिसर व गाव स्वच्छ ठेवले तर आजारावर होणारा कितीतरी खर्च वाचेल."या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. पी.पी.सुरडकर व प्रा. ए.म.व्ही जाधव हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. विठ्ठल भानुसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत देशमुख यांनी केले.कार्यक्रमाची सांगता महाविद्यालय व समोरील भाग स्वच्छ करून केली.त्यानंतर उपस्थित कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांनी हातात केरसुणी घेऊन परिसर स्वच्छ केला.