असलम परवेज:लोणार
दिनाक: 29/09/2023
|लोणार| दिनांक 27 सप्टेंबर रोजी लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी व शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी सकाळी 8 वाजता धार परिसर येथे सरोवर परिसरातील साफसफाई केली व तसेच अकरा वाजता वृक्षारोपण केला. शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व ओबीसी विभाग युवक काँग्रेस व नगरपालिकेच्या वतीने
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे महासचिव खासदार मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसा निमित्त लोणार शहरात भव्य वृक्षारोपण व तांडा येथील समशान भूमी, घनकचरा, तथा विविध जागी वृक्षरोपण करण्यात आला. तसेच जागतिक पर्यटनदिनानिमित्र लोणार सरोवर येथे येणाऱ्या पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सरोवर परिसरातील साफसफाई करण्यात आली.
यावेळी ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात ज्येष्ठ नेते शांतीलाल गुगलीया, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते भूषण मापारी, ज्येष्ठ नेते प्रदीप संचेती, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, नगरसेवक संतोष मापारी, नगरसेवक शेख रऊफ शेख महबूब,ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विकास मोरे, शहर उपाध्यक्ष रामचंद्र कोचर, माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब, माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, माजी नगरसेवक पंढरी चाटे, गजानन मापारी, कृष्णा बाजाड, मनीष पाटोळे, नाईक, केतन बाजाड, किरण बाजड, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
