Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व लोणार सरोवर स्वच्छता उपक्रम

Responsive Ad Here


असलम परवेज:लोणार


|लोणार|        दि.27 सष्टेबर रोजी लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे महासचिव मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसा निमित्त लोणार शहरात वृक्षारोपण तसेच जागतिक पर्यटन दिन निमित्त लोणार सरोवर येथे येणाऱ्या  पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच लोणार सरोवर परिसराची स्वच्छता आणि पर्यटकांचे स्वागत करण्याचा कार्यक्रम दि. 27/09/23 रोजी सकाळी 8 वाजता धारातीर्थ येथे  ठेवण्यात आला. आणि 10 वाजता वृक्षारोपण उपक्रम आयोजीत केला होता. यावेळी सर्व आजी माजी नगरसेवक, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, एन.एस.यु.आय.आय चे पदाधिकारी, अल्पसंख्यांक सेलचे पदाधिकारी, ओबीसी सेलचे पदाधिकारी, सर्व फ्रंटसेलचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्नबाजार समितीचे सर्व संचालक, तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी तसेच शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद व बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत मापारी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, नगरपालिका अध्यक्षा पुनम पाटोळे, गटनेते भुषण मापारी, यांनी दिली आहे.