Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

"हिंदू-मुस्लिम एकतेची मिसाल कायम; लोणार येथे एकाच दिवशी जशने ईद मिलादुन्नबी व गणपती विसर्जन शांततेत"

Responsive Ad Here


हिंदू मुस्लिमांमध्ये सामाजिक सलोखा व भाईचारा असाच असावा - तोफिक कुरेशी लोणार

असलम परवेज:लोणार तालुका प्रतिनिधी


|लोणार|          जागतिक कीर्तीच्या 'अ' दर्जा प्राप्त जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथे गुरुवार दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी नवीन इतिहास रचला गेला आहे. सकाळी ईद मिलादुन्नबीचे जुलूस तर दुपारून गणपती विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पाडली.

       पहिल्यांदाच जशने ईद मिलादुन्नबी व गणपती विसर्जनाचे दोन्ही  हिंदू-मुस्लीमांचे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आल्याने पोलिस प्रशासन व जनतेत चिंतेचा विषय होता. अशात जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस प्रशासन व दोन्ही कार्यक्रमांचे आयोजक प्रयत्नशील होते.

            राष्ट्रीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष तौफिक कुरेशी,  सामाजिक कार्यकर्ते हरुन भाई, अब्दुल अजीज शेख जैनोद्दीन, डॉ.हाफीज जुबेर, व मौलाना सईद सोबत इतर मुस्लिम समाज बांधवांनी  पुढाकार घेऊन ईदमिलादुन्नबी जुलूसचे नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन केले.    

             सकाळी ९:०० वाजता जामा मस्जिद चौक मधून शांतपणे हा जुलूस निघाला. शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस साजरा करत  शहरातील जामा मस्जिद चौक, पोलीस स्टेशन,साबणपुरा, धार चौक, मुस्लिम कब्रस्तान या शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. यावेळी परभणी वरून आलेले प्रमुख प्रवक्ते मौलाना मोहम्मद रफीउद्दिन अशरफी यांनी जातीय सलोखा आणि भाईचारा ठेवावा व कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे आणि सामोपचाराने विषय हाताळावे अस आवाहन ह्या प्रसंगी जमलेल्या मुस्लिम समुदयाशी केलं.

         यावेळी ठिकठिकाणी समाज बांधवांनी  चहा-पाणी,बिस्किट,शरबत,नाष्टा व जेवणाची व्यवस्था केली. ठरलेल्या वेळेत सकाळी १२:०० वाजता आयोजकांच्या वतीने ह्या जुलूसची शांततेत सांगता करण्यात आली. त्यानंतर दुपारून हिंदू बांधवांनी गणपती विसर्जनाची मिरवणूक   काढली. अशाप्रकारे हिंदू मुस्लिम एकतेचा सर्वांना संदेश देऊन लोणार मध्ये जातीय सलोखा जपला गेला.

       या दोन्ही रॅल्यामध्ये शहरातील सर्व धर्मीय, सर्व राजकीय पक्षाची नेते, पदाधिकारी व  समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.