Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

*श्री संत गजानन महाराज चरित्र कथेवर ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे प्रवचन

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनीधी जितेश करीया 


अकोला:- वीरवैष्णव ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे योगीराज सद्गुरू संत गजानन महाराजांचे चरित्र यावर 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर सकाळी 7.30 ते 9.30 गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमामध्ये झी टॉकीज चॅनलवर प्रथममच प्रवचन प्रसारित होणार आहे.

संत गजानन महाराजांचे पट्टशिष्य संत भास्कर महाराज यांचे नातू गुरुवर्य संत वासुदेव महाराज यांचे  परमशिष्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मुखातून संत गजानन महाराज यांचे चरित्र ऐकण्याची ज्ञान व भक्तिमय पर्वणी झी टॉकीज ने योगीराज सद्गुरू संत गजानन महाराजांच्या भक्त परिवाराकरिता उपलब्ध करून दिली आहे. 

संत गजानन महाराज चरित्र कथा प्रवचन  3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरला सकाळी साडेसात ते साडेनऊ या दरम्यान प्रसारित होणार आहे. या ज्ञान व भक्तिमय पर्वणी मध्ये विदर्भातील संत नरसिंग महाराज, ज्ञानेशकन्या संत गुलाबराव महाराज, संत गौरीशंकर महाराज,संत सखाराम महाराज,संत सोनाजी महाराज,संत झिंगराजी महाराज अशा संत गजानन महाराज यांच्या सानिध्यात राहिलेल्या संतांचेही चरित्र ऐकण्याची पर्वणी यादरम्यान भाविकांना मिळणार आहे या संधीचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन संत गजानन महाराज भक्त सांप्रदायाचे वतीने अनंत गावंडे यांनी केले आहे.