Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्सवात साजरी

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनीधी :- जितेश कारीया

हिवरखेड  येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत जगनाडे महाराज यांची जयंती राजेश बेलूरकर यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. स्त्री आणि पुरुष ह्याच दोन जाती आहेत असे सांगुन जातीव्यवस्थेवर प्रहार करणारे संत म्हणजे संताजी जगनाडे महाराज , तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांच्यामुळे जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचल्या ते संत म्हणजे संताजी जगनाडे महाराज, भटांनी तुकाराम गाथा बुडविल्यानंतर संताजींनी ती गाथा पुन्हा लिहून काढली याला कारण म्हणजे संताजी तुकोबांच्या 13 टाळकऱ्यांपैकी एक होते व तुकोबांचे बहुतेक अभंग त्यांना मुखोद्गत होते.

बाकीचे अभंग त्यांनी आजूबाजूच्या गावात फिरून लोकांकडून मिळवले.तुकोबांच्या अभंगांना सुभाषितांचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ते लोकांच्या पाठ होते.एकप्रकारे इंद्रायणीत बुडवलेली तुकोबांची गाथा जगनाडे महाराजमुळे तरली. भक्तिमार्गात ज्या गाथेचा उल्लेख पंचम वेद म्हणून केला जातो ती तारणारे संत म्हणजे जगनाडे महाराज. आज त्यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रसादाचे वाटप करून संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच संदिप इंगळे,राजेश पांडव, गजानन बेलूरकार, साहेबराव बेलूरकार,राजेश बलुरकार,दिलीप नाचणे,पंजाबराव ईचे, विजय खेडकर, गजानन गावत्रे, अंकुश निळे, पवन गावत्रे,उमेश नाचणे, किशोर नाचणे, पत्रकार धीरज बजाज, अजिंक्य पांडव यांच्यासह बहुसंख्य तेली समाज बांधव

अखिल भारतीय पत्रकार संघाचे पत्रकार उपस्तीत होते.